अमित खोत | मालवण : महसूल पंधरावडा अंतर्गत ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ या संकल्पनेतून मालवण तहसील कार्यालय परिसरात रविवार (4 ऑगस्ट) रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांसह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस, नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.











