मसूरे (प्रतिनिधी ): मसुरे-देऊळवाडा येथील रहिवाशी पंढरीनाथ यशवंत परब (९५) यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. परब यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. मसुरे ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून सलग २० वर्षे कार्यरत होते. मसुरे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी सेक्रेटरी १५ वर्षे, तसेच स्थानिक दत्तमंदिर उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष १५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात एक भाऊ, दोन मुलगे, पुतणे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. मुंबईचे अग्निशमन दलाचे जवान दत्तात्रय परब व सामाजिक कार्यकर्ते राजन परब यांचे ते वडील होत. आचरा ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल मिलिंद परब यांचे ते आजोबा होत.












