यादी शासनाला सादर : जुन व ऑगस्ट महिन्याचे पैसे असे एकूण तीन हजार रु जमा होणार!
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
सिंधुनगरी : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ ३५ ५२७ अर्ज पात्र ठरले असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 42 हजार 941, कुडाळ विधानसभा मतदारसंघात 43 हजार 989 व कणकवली विधानसभा मतदारसंघात 49 हजार 957 महिलांचा समावेश आहे. पात्र महिलांची यादी शासनाकडे सोमवारी सादर झाली असून जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे या पात्र अर्जदारांच्या खाती जमा होणार आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांचे 100% छाननी पूर्ण करून पात्र महिलांची यादी शासनाकडे पाठवणारा सिंधुदुर्ग जिल्हा पहिला जिल्हा ठरला आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी किशोर तावडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, उपविभागीय अधिकारी तहसीलदार आधी सर्व महसूल यंत्रणा जिल्हा परिषद पंचायत समित्या सरपंच अंगणवाडी सेविका मदतनीस या सर्वांनीच अर्जदार महिला लाभार्थ्यांची समन्वय ठेवून मोबाईल ॲप द्वारे हे अर्ज ऑनलाईन केले आहेत. एक लाख 50 हजार 560 असे एकूण अर्ज होते. त्यातील 14,973 अर्जामध्ये त्रुटी राहिल्या नसून त्या त्रुटी दूर करण्याचे संधी या अर्जदारांना देण्यात आली आहे तर 60 अर्ज निकषांमध्ये बसत नसल्यामुळे रद्द करण्यात आले आहेत. आता मोबाईल ॲप बंद होऊन वेब पोर्टलवर अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. शिल्लक राहिलेल्या लाभार्थी अर्जदाराने आपले कागदपत्र गोळा करून ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.
राज्य सरकारने यासाठी एक विधानसभा मतदारसंघ निहाय त्री सदस्य कमिटी निर्माण केली आहे. कणकवली विधानसभा कमिटीचे अध्यक्षपदी संजना सावंत व समिती सदस्य म्हणून सावी लोके सीमा नानिवडेकर, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया वालावलकर या अध्यक्ष तर सदस्य म्हणून रुपेश कानडे व राजू परुळेकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात श्वेता कोरगावकर या समिती अध्यक्ष व सदस्य म्हणून प्रसन्न उर्फ बाळू देसाई व एकनाथ नाडकर्णी अशा तीन समित्या असून या समित्यानी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबवीली गेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाला सहकार्य करत या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी सहभाग घेतला आहे. या योजनेत ज्या महिला लाभार्थ्यांचे अर्ज अपूर्ण असतील त्यांना ते दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच नवीन अर्जदारांना आपले अर्ज दाखल करण्यासाठी वेब पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहण प्रभाकर सावंत यांनी केले आहे.











