समस्त हिंदू समाजाचे वतीने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
राजापूर (वार्ताहर): उरण मधील कुमारी यशश्री शिंदे या हिंदु तरुणीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, या मागणीचे निवेदन राजापूर येथील तहसीलदार कार्यालयात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना व समस्त हिंदू समाज यांच्या वतीने सोमवारी देण्यात आले. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अग्रेशीत करण्यात आलेले निवेदन निवासी नायब तहसीलदार सौ. दिपाली पंडित यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
नवी मुंबईमधील उरण येथील कुमारी यशश्री शिंदे (वय 22) हीची अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली. ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेमुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे श्रद्धावालकर प्रकरणाची आठवण संपूर्ण देशाला झाली आहे.नवी मुंबईतील विवाहितेच्या शीळ डाकघर परिसरातील खून प्रकरणाची घटना ताजी असतानाच उरणमधील ही घटना अतिशय सून्न करणारी आहे. ही केवळ पहिली घटना नसून आतापर्यंतअनेक हिंदू मुलींना जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आलेले आहे. एकूणच राज्यात दिवसेंदिवस लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. गेल्या काही वर्षांपासून महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत देशात खुले आम युवतींच्या हत्या होत आहेत. त्यामुळे महिला आणि मुली यांचे जीवन असुरक्षित झाले आहे. महाराष्ट्रातून 2019 ते 2021 या तीन वर्षाच्या कालावधीत एक लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि गायब होत असतील तर यामागे काही षडयंत्र तर नाही ना? लव्ह जिहादचा प्रकार तर नाही ना? याचीही चौकशी करण्यासाठी गृह खात्याने स्वतंत्र पथक नेमायला हवे. तसेच राज्यात लवकरात लवकर लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करावा. लव्ह जिहाद ची प्रकरणे हाताळण्यासाठी व त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर अँटीरोमिया स्कॉड सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. मुसलमान युवक आणि हिंदू व्यक्ती यांच्या प्रेमप्रकरणांच्या तक्रारी लव्ह जिहाद म्हणून नोंदवल्या जाव्यात. या प्रकारासाठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवाईंसाठी होणारा वापर यांची शासनाने चौकशी करावी आणि त्यात सापडलेल्या दोषींवर अत्यंत कडक कारवाई करावी. या प्रकरणात काही धर्मांध आणि कट्टरतावादी जिहादी संघटना, जिहादी नेते आढळून आल्यास त्यांच्यावरही तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत.
निवेदन देतांना सौ. श्रुती ताम्हणकर, सौ. गौरी अभ्यंकर, विश्व हिंदू परिषदेच्या सौ. माधवी हर्डीकर, भाजपाच्या सौ.सुयोगा जठार, माजी नगरसेविका सौ.शितल पटेल,सौ. विनया शेट्ये, सुधा चव्हाण, श्रीमती प्रतिभा मराठे, सौ.संजीवनी मालपेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, दिपक बेंद्रे, सुभाष पवार, राजाभाऊ रसाळ, संदेश टिळेकर, दिलीप गोखले, मोहन घुमे, विनायक सावंत, हिंदू जनजागृती समितीचे विनोद गादीकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे महेश मयेकर, बजरंग दलाचे निकेश पांचाळ, ओंकार मित्र मंडळाचे अध्यक्ष विवेक गुरव यांचे सह अनेक हिंदुत्वनिष्ठ यावेळी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.












