दापोली | प्रतिनिधी:- दापोली भाजपा तर्फे दापोली येथून दर सोमवारी मार्लेश्वर दर्शन साठी महिलांसाठी मोफत बस सेवा चालू केलेली आहे आज दिनांक 05 ऑगस्ट रोजी दापोली येथून पहिली मारलेश्वर साठी मोफत बस सेवेचे श्री केदार साठे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते उद्घाटन करून सकाळी दोन बस मार्लेश्वरसाठी सोडण्यात आल्या आहेत. तरी महिलानी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आव्हान भाजप कार्यालयाकडून करण्यात आले आहे. याप्रसंगी केदार साठे संदीप केळकर नगरसेविका जया साळवी अमित तांबे, पुजा साखळकर व महिला वर्ग उपस्थित होता.











