
वास्तुतज्ञ मधुकर लाड यांच्या सहकार्याने आचरा हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वाटप
आचरा–अर्जुन बापर्डेकर : आपण ज्या शाळेत शिकलो तेथील मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उदात्त हेतूने मुंबई येथील सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ मधुकर लाड यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले.
दात्याचे हे दातृत्व गुण अंगीकारून समाजऋण फेडा असे आवाहन वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी केले.
आचरा गावचे सुपुत्र आणि मुंबई येथील वास्तुतज्ञ मधुकर लाड यांच्या सौजन्याने त्यांनी आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ न्यू इंग्लिश स्कूल आचरेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि स्थानिक स्कूल समिती सदस्य राजन पांगे,मधुकर लाड यांचे बंधू प्रकाश लाड,विजय लाड,स्थानिक स्कूल समिती सदस्य
संजय पाटील, अर्जुन बापर्डेकर, मुख्याध्यापक गोपाळ परब,उप मुख्याध्यापक अंकुश घुटूकडे,प्रकाश महाभोज, मधुरा माणगांवकर,उज्वला कदम,शेलार,सद्गुरु साटविलकर ,सौ फर्नांडिस यांसह अन्य शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार परब सर यांनी मानले.










