पर्यटकांसाठी क्यु आर कोड असलेले मार्गदर्शक फलक

 

 

पर्यटनस्थळापर्यत पोहचण्याचा प्रवास होणार सोपा 

शिरगाव ( प्रतिनिधी)   महाराष्ट्र शासन, नियोजन विभागामार्फत सिंधुरत्न समृद्ध योजनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने गावागावातून जाणा-या रस्त्यालगत पर्यंटकांसाठी क्यु आर कोड असलेले मार्गदर्शक फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांना आता इच्छित पर्यटनस्थळापर्यत सहजरित्या वेळेत पोहचता येणार आहे.त्यामुळे वेळ वाचणार आहे. तसेच यामुळे गावागावातील दुर्लक्षित असणारी पर्यटनस्थळे उजेडात येणार आहेत.

शिरगाव- कुवळे- सांडवे- रामगडमार्गे मालवण व शिरगाव- चाफेड- भरणीमार्गे कणकवली हे दोन्ही मार्ग साळशी गावातून जात असून या मार्गानजीक क्यु आर कोड असलेले मार्गदर्शक फलक उभारण्यात आले आहेत

या मार्गदर्शक फलकावरील असलेला क्यु आर कोड मोबाईल वरुन स्कॅन केल्यानंतर इच्छित ठिकाणचा मार्ग आणि अंतर समजल्यामुळे त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रवास सोपा होणार आहे.

तसेच सदर प्रवास गावागावातून करताना तेथील धार्मिक स्थळे, ऐतिहासिक खाणाखुणा दाखविणारी कातळशिल्पे,गुहा,धबधबे या सारखी बरीच ठिकाणे प्रसिद्धीच्या झोतात येणार आहेत.