वैभववाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समिती बैठक संपन्न
कलाकार मानधन मंजुरी पत्राचे वाटप
वैभववाडी l प्रतिनिधी : जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी कटीबद्ध आहोत. शासनाच्या विविध योजना तळागाळातील वृद्ध कलाकारांपर्यंत निश्चित पोहचविल्या जातील. शासनाकडून मिळणारे मानधन हे त्या कलाकारांच्या कुटुंबाला आधार असेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी केले.
वैभववाडी येथील भाजपा कार्यालयात राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समितीच्या वतीने तालुक्यातील ९ वृद्ध कलाकारांना मानधन मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे. माजी अध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, सज्जनकाका रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष प्राची तावडे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, सुनील रावराणे, अंबाजी हुंबे, पुंडलिक पाटील, बंडया मांजरेकर व भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच लाभार्थी होते उपस्थित होते. यावेळी जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, रितेश सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. आभार सुधीर नकाशे यांनी मानले.









