झाडांना राख्या बांधूया पर्यावरणाचे रक्षण करूया

 

कृषिमित्रांनकडून झाडाला राखी बांधून जनजागृती

सावंतवाडी । प्रतिनिधी : उद्यानविद्या महाविद्यालय ,मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आलेल्या कृषिमित्रांनकडून झाडाला राखी बांधून जनजागृती कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सहाय्याने राखी तयार करू शालेय परिसरातील नारळाच्या झाडाला बांधण्यात आली. या उपक्रमा अंतर्गत ‘झाडांना राख्या बांधूया पर्यावरणाचे रक्षण करूया, झाडे लावा झाडे जगवा, वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका’ असे संदेश ग्रामस्थांना देण्यात आले. सोबतच कृषिमित्रांनी वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर होणारा परिणाम
विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना सविस्तर समजावून सांगितला.

 

 

सदर कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा इन्सुली क्र.०६ येथे पार पडला. तेथील मुख्यादापिका सौ. गावडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केेले व कृषिमित्रांचे कौतुक केले. सदर गटा मध्ये प्रियश राघोबा धुरी, मल्हार संदिप महाजन, हर्षल अरुण पाटील, श्रेयस जयंत गायकवाड, ओवेश गुलाम मिर्झा नाडकर, नंदन आर, सौरजो किरण चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.