नवानगर येथे घरावर दरड कोसळली,कोणतीही जीवितहानी नाही

 

गुहागर l प्रतिनिधी :गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने कालपासून मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली .या मुसळधार पडणाऱ्या पावसामध्ये गुहागर तालुक्यातील वेलदूर नवानगर येथे घरावरती दरडिचा बांध कोसळुन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे .

येथील रंजीत रमेश आंबेरकर यांच्या मालकीचा जागेचा बांध हा गोपाळ सजण्या शिरगावकर यांच्या घरावर पडला आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.शुक्रवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाली आहे.