श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सडुरे व शिराळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

नवलराज काळे यांची सामाजिक बांधिलकी

वैभववाडी | प्रतिनिधी – श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडीच्या वतीने सडुरे व शिराळे या गावात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य नवलराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त्त हा उपक्रम पार पडला. गेली अनेक वर्ष नवलराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान दिले आहे.

 

 

याप्रसंगी सडुरे शिराळे गावाच्या वतीने नवलराज काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच आनंद जंगम, ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज काळे, विलास जंगम, सौ विशाखा काळे, रेश्मा बाणे, प्रियांका पाटील, दीक्षा रावराणे, रवळनाथ सोसायटी अध्यक्ष संतोष भोसले, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष विठ्ठल काटे, माजी सरपंच विजय रावराणे,शिराळे भाजपा बूथ अध्यक्ष विजय पाटील, सडूरे भाजप बूथ सत्यवान डांगे, मनोहर बोडेकर, बबन रावराणे, माजी उपसरपंच संतोष पाटील, रमाकांत रावराणे, मालती रावराणे, दत्ताराम रावराणे, शुभांगी बोडेकर, आकाराम बोडेकर, भगवान बोडेकर, महेश डेळेकर, अंकिता डेळेकर, रसिका पाटील, चंद्रकांत डेळेकर, संदीप धामणे, प्रभाकर राणे, माजी पोलीस पाटील प्रकाश रावराणे, उदय रहाटे, मुख्याध्यापक विनोद करपे, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, अशोक पाटील, कोतवाल मोहन जंगम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.