भारतीय संविधान बदलण्याची ताकद कोणातच नाही 

 

 

केंद्रीय मंत्री नामदार डॉक्टर रामदास आठवले 

खेड (प्रतिनिधी) संविधान बदलण्याची प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत असा अप्रचार वारंवार काँग्रेस पक्ष करत आहे मात्र संविधान बदलण्याची ताकद कोणाचाच नाही ते बदलणे अशक्यच असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारी ता मंत्री तसेच रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रामदास आठवले यांनी केले

 

ते भरणे ते आयोजित रिपाईचे कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे कोकण युवक अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या रिपाईच्या कोकण मेळाव्यात ते बोलत होते ते बोलताना पुढे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न देणे कधी आठवले नाही संसदेच्या सेंटर हॉलमध्ये त्यांची प्रतिमा लावण्याची कधी आठवण झाली नाही असा काँग्रेस पक्ष सत्ताधारी संविधान बदलू पाहत आहेत अशी खोटी अफवा उठवून देशात संभ्रम निर्माण करत आहेत मात्र संविधानाचा गाभा इतका मजबूत आहे की तो कोणालाच बदलणे शक्य नाही तसे झाल्यास आम्ही आमचे प्राण पणाला लावू असा इशारा आठवले यांनी दिला

 

आमचा पक्ष छोटा असला तरी निर्णय क्षणी कोणाला हरवायचं अन कोणाला जिंकू द्यायचं हे आम्ही ठरवतो आमच्यात कितीही गट असू द्या दिल्लीपर्यंत पोहोचणारा पट्ट्या मी एकच असल्याचे ते म्हणाले मी ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते त्यामुळे विकासाचे मुद्दे महत्त्वाचे असून यापुढे मत मिळवण्यासाठी खोटे मुद्दे यापुढे चालणार नाहीत कारण मी निर्माण केलेले कार्यकर्ते सत्तेसाठी नव्हे तर आंबेडकरी चळवळ उभारणीसाठी तयार केलेले आहेत रिपाई हा पक्ष डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे तो सर्व जातीधर्माची एकत्र मोट बांधणारा पक्ष आहे बाबासाहेबांची विचारधारा पोहचवणारा पक्ष असल्याचे ते म्हणाले कोकणाच्या विकासा च्या प्रश्नां बाबत बोलताना ते म्हणाले की गेली अनेक वर्ष रखडलेला महामार्ग कोकणाच्या विकासासाठी पूर्ण होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कोकणातील बेदखल कुळे, गायरान पडीक जमिनी यांचे प्रश्न देखील सुटणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले

 

राज्य सरकारने कोकणातील विशेष करून खेड साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्याकरिता जो भरून नदी दिला आहे यातून खेडचा विकास आमदार योगेश कदम हे करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला याप्रसंगी शिवसेना शिवसेना नेते रामदास कदम यांनी बोलताना सांगितले की संविधान विरोधी अवयव उठवणाऱ्यांना नामदार आठवले हे त्यांचा आवाज नक्कीच बंद करतील असा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणाले की सध्या कोकणातील तरुणांसाठी योग्य उद्योगावर लक्ष केंद्रित करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आपला भरी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सभापती हा रिपाई जर असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली

 

 

सकाळी मांडवी एक्सप्रेसने नामदार आठवले यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी खेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सम्राट अशोक नगर येथील साडेतीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या डॉक्टर आंबेडकर भवन याचे भूमिपूजन केले त्यानंतर भरणे येथील पक्ष कार्यालयाचा शुभारंभ देखील त्यांच्या हस्ते पार पडला

 

 

या प्रसंगी रायगड रत्नागिरी , दापोली मंडणगड , चिपळूण राजापूर गुहागर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते