खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील भडगाव – खोंडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते दिवाकर प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात अग्रस्थानी असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी झटत आहेत. या निवडीबद्दल ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच दीपक पदुमले यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.
याप्रसंगी उपसरपंच महेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा उसरे, वैभवी उतेकर, माजी अध्यक्ष नारायण म्हस्के, सुरेश चिकणे, रघुनाथ शिगवण, विजय दवंडे, प्रदीप कांबळे सुरज जोगळे, अनिल नक्षे, परशुराम दवंडे, ग्रामविकास अधिकारी मिनाक्षी वाजे आदी उपस्थित होते.











