ओटवणे(प्रतिनिधी) विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी विलवडे येथील जेष्ठ, सामाजिक कार्यकर्ते, पंचायत समिती सावंतवाडी माजी उपासभापती कृष्णा उर्फ दादा सावंत यांची ग्रामसभेत बिनवीरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश दळवी उपसरपंच विनायक दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
विलवडे गावच्या सामाजिक धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नेहमीच सहभाग असणाऱ्या दादा सावंत यांच्या शब्दालाही विलवडे गावात मोठा मान दिला जातो.त्यांच्या निवडी बाबत त्यांचे ग्रामस्थानमधून अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छाही देण्यात येत आहेत.या निवडी प्रसंगी माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम दळवी, निवृत्त सैनिक अरुण दळवी, ग्रामसेवक आरती चव्हाण, भालचंद्र गवस, जयप्रकाश दळवी, शिल्पा धरणे, प्रमोदीनी गवस आदी मान्यवर उपस्थित होते.










