रत्नागिरी | प्रतिनिधी :तालुक्यातील तोणदे येथे विषरी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचरांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवार 31 ऑगस्ट रोजी रात्री 8.20 वा.घडली.
विघ्नेश देवेंद्र भाटकर (24,रा.तोणदे भंडारवाडी,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विघ्नेशने शनिवारी सकाळी अज्ञात कारणातून राहत्या घरी गवत मारण्याचे ग्रामोग्झोन हे विषारी औषध प्राशन केले होते. काहीवेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना रात्री 8.20 वा. विघ्नेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












