सावर्डे विद्यालयाचे हॉलीबॉल स्पर्धेत यश

 

19 वर्षाखालील संघाचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

 चिपळूण (प्रतिनिधी)— – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित चिपळूण तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेच्या भव्य सह्याद्री क्रीडा संकुलात नुकत्याच आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत 14, 17 व 19 वर्ष वयोगटाखालील मुले व मुलींच्या संघाने बहुसंख्येने आपला सहभाग नोंदविला आहे. 19 वर्षाखालील मुलांच्या चुरशीच्या झालेल्या शालेय हॉलीबॉल स्पर्धेत गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी डी बी जे कॉलेज चिपळूणच्या खेळाडूंचा पराभव करत तालुक्याचे जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान पटकावला आहे व सह्याद्रीची यशाची परंपरा कायम राखली आहे.

 

या संघांमध्ये अरमान मुल्लाजी, अफान इब्जी, आर्यन आंबेकर, तुषार पाणींद्रे, प्रतीक बल्लाळ, सोहम गुजर,असरार चिकटे या खेळाडूंनी नेत्र दीपक खेळ केला. शालेय हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटाखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले आहे. या सर्व खेळाडूंना दादासाहेब पांढरे अमृत कडगावे प्रशांत सपकाळ व रोहित गमरे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सर्व संचालक,पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर,सर्व सदस्य, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्रचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी कौतुक केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.