चिपळूण (प्रतिनिधी) : महिला प्रकोष्ठ लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी राजश्री घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राज्य अध्यक्षा डॉ. वंदना जाधव यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
राजश्री घाटगे यांच्या एकूणच सामाजिक कार्याची तसेच पक्षाच्या वाढीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राजेश्री घाडगे जिल्ह्यात महिला सक्षमिकरण, महिला बळकटीसाठी व महिलाच्या विविध समस्यासाठी काम केले आहे. या निवडीमुळे जिल्ह्यात पक्षाला नवी बळकटी मिळणार असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.













