झाराप पत्रादेवी बायपासवर जीवघेणे खड्डे : अपघाताची भिती

नेमळे । प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली आहे.
महामार्गावर ठीक ठिकाणी धोकादायक असे जीवघेणे खड्डे पडले असून वाहने चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नेमळे तिठ्याच्या बाजूने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर दोन फूट खोल आणि सहा फूट लांबीचा मोठा चर पडलेला आहे. त्यामुळे थोडासां जरी पाऊस पडला तरी याठिकाणी चरात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरित हा चर बुजवण्याची मागणी स्थानिकांमधून तसेच वाहनधारकांमधून करण्यात येत आहे.