लखनऊ : मिठाई म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी आलं असेल. सणवार असो वा कोणता खास कार्यक्रम, क्षण तोंड गोड करण्यासाठी मिठाई असतेच. पण कितीही आवडत असली तरी दररोज कुणी मिठाई खात नाही किंवा मिठाई खरेदीसाठी मिठाईच्या दुकानात जात नाही.
एक महिला मात्र सतत मिठाईच्या दुकानात जायची. त्यामागील कारण असं की तिचा नवराही हादरला.
उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील ही प्रकरण. जखनिया येथील बीआरसीसमोर असलेल्या मिठाईच्या दुकानात एक महिला सतत जात होती. अन्नू असं तिचं नाव. तीन मुलींची ती आई. तिच्या नवर्याला तिच्यावर संशय होता. त्यानंतर असं काही घडलं की पोलीसही हादरले. पतीने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पाळत ठेवून महिलेला अटक केली.
महिला का जायची मिठाईच्या दुकानात?
अन्नू तीन मुलींची आई. जखनिया बीआरसीसमोरील चहा आणि मिठाईच्या दुकानात ती दररोज जात असे. यावेळी तिची रस्त्यावरील एका विक्रेत्याशी नजरानजर झाली.
त्यानंतर ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की जुलै महिन्यात ती घरच्यांना न सांगता आठवडाभर पळून गेली. नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती सासरच्या घरी आली. 29 ऑगस्टच्या रात्री ती तिच्या तीन मुली आणि पतीला सोडून पुन्हा पळून गेली. पती चेतनने अन्नूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती सापडली नाही.
मुलींना मारण्याचा प्रयत्न
प्रेमात अडथळा नको म्हणून तिन्ही मुलींपासून सुटका करून घेण्यासाठी तिनं त्यांना ठार मारण्याचं ठरवलं. कुटुंबाच्या तत्परतेमुळे दोन मुलींचा जीव वाचला. पण एका मुलीचा मृत्यू झाला.
या प्रकरणी चेतनने पत्नी, मेव्हणा आणि इतर नातेवाईकांविरुद्ध भुरकुडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस अन्नूचा शोध घेत होते.
महिलेला अटक
पाळत ठेवत अन्नूचे ठिकाण रेल्वे स्थानकाच्या आसपास सापडले. तिथून तिला अटक केली. तरावती पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणाले की, पाळत ठेवलेल्या माहितीवरून अन्नूला अटक करण्यात आली आहे. चौकशीत तिने प्रियकराच्या सांगण्यावरून आपल्या तीन मुलींना मारण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केलं.












