राजंगा फार्मर प्रोड्यूसर कंपनीतर्फे मांडकी पालवन कृषी महाविद्यालयाला स्टबल मुव्हर मशीनचे वितरण

राजापूर (वार्ताहर): येथील राजंगा फार्मर प्रोड्यूसर कंपनीने अल्पावधीत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. कंपनीमार्फत शेती विषयक मार्गदर्शन आणि किफायतशिर दरामध्ये कृषी अवजारांचे वितरण केले जात आहे. नुकत्याच या कंपनीद्वारे गोविंदराव निकम कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, मांडकी पालवण येथे किसान क्राफ्ट कंपनीची स्टबल मुव्हर (झुडुपे/वनस्पती खोड नाश करणारे) मशीन डेमोसहित देण्यात आली.

 

 

राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत अॅग्रीकल्चर डेवलपमेंट ट्रस्ट बारामती यांचे सहकार्याने स्थापन करण्यात आलेली राजंगा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, राजापूर या शेतकरी उत्पादक कंपनीतून वेळोवेळी सभासद शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
कंपनी मार्फत शेतकऱ्यांना विविध शेतीविषयक अवजारे, औषधे, बी बियाणे, खते तसेच कृषि प्रक्रिया उपयुक्त विविध साधन सामुग्री व प्रक्रिया अवजारे तसेच शेती विषयक सल्ला व मदत वेळोवेळी केली जाते. नुकत्याच या कंपनीद्वारे गोविंदरावजी निकम कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर, मांडकी पालवण येथे किसान क्राफ्ट कंपनीची स्टबल मुव्हर (झुडुपे/वनस्पती खोड नाश करणारे) मशीन डेमोसहित देण्यात आली. यावेळी कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण चे संस्थापक अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे व संस्थेचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, राजंगा कंपनीचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ, उपाध्यक्ष हरेंद्र बाणे तसेच कॉलेज पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

डॉ. निखिल चोरगे तात्काळ या कंपनीचे शेअर खरेदी करुन शेतकऱ्यांचे दृष्टीने सदैव कर्तव्यतत्पर असणाऱ्या या शेतकरी कंपनीसाठी वेळोवेळी गरजेनुरूप सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली आहे. येणाऱ्या काळात या घटनेमुळे कंपनीच्या घडामोडींवर याचा सकारात्मक प्रभाव पडणार असून डॉ. निखिल चोरगे यांचे कल्पक व शेतिनिष्ठ मानसिकतेतून कंपनीला मोलाचे सहकार्य मिळणार आहे. कंपनीचे सभासद होऊन कंपनीवर दाखविलेल्या विश्वासाला पात्र होवून भविष्यात यशस्वी भरारी देण्याचा प्रयत्न राजंगा कंपनीद्वारे करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.