खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील आंबवली गावामध्ये सध्या ऐन गणेशोत्सव सणाच्या वेळी गावामध्ये नळपाणी योजनेच्या पाण्याचा तुडवडा निर्माण झाल्याने पाणी ग्रामस्था मधून तीव्र नाराजीचे सूर येत आहे
सध्या सणा साठी गावामध्ये मुंबई व पुणे येथून चाकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. परंतु ऐन सणाच्या वेळी, नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणी सलग ५ दिवस आल्याने न आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला
तसेच नळपाणी योजनेचे पिण्याचे पाणी स्रोतां चे शुद्धीकरण केलेलं नसल्याची ही बाब पुढे येत असून इतर साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत ग्रामस्थ संता पले आहेत वारंवार आंबवली ग्रामपंचायत संरपच व सदस्य तसेच पाणी पुरवठा कमिटी यांना सुचना व तकार करून सुद्धा लक्ष दिली जात नाही. याबाबत ग्रामस्थाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









