दुचाकी स्वारचा मृत्यू तर महिला जखमी
दोडामार्ग l सुहास देसाई :दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी ते बेळगाव दरम्यान भाजी वाहतूक करणाऱ्या बोलेरो (एम एच 07.पी.2598) पिकअपची समोरून येणाऱ्या दुचाकी( जीए.11.बी 2060. एक्टिव्हा )ला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एक्टिव्हा चालक संतोष मधुकर शेटकर( वय 52 )रा.घोटगेवाडी हा अधिक उपचारसाठी नेत असताना मृत्यू झाला.तर त्यांच्या मागे बसलेल्या अलमीरा मिंगिस सोज ( 50 ) रा.तिराळी या गंभीर जखमी झाल्या आहेत. तर बोलेरो पिकअप मधून वाहतूक करणाऱ्या आफ्रिन आदम नाईकवाडी( 26) आणी आजम आदम नाईकवाडी( 10) या किरकोळ जखमी झाले आहेत.हा अपघात घोटगे वायंगणतड येथे सकाळी 9:45 वाजता घडला.
या बाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व त्यांची टीम करत आहेत.












