डिजिटल कॉम्प्युटर्स यांच्याकडून शाळेला भेट

 

मंडणगड :प्रतिनिधी : येथील मंडणगड तालुका विकास मंडळ मंडणगड संचलित ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड
या विद्यालयातील 19 वर्षावरील गटातील हॉलीबॉल संघाची मंडणगड तालुक्यातून जिल्ह्यासाठी निवड झाली आहे. हा संघ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. याचा अभिमान सर्व मंडणगड वासियांना आहे.या भावनेतून
डिजिटल कॉम्प्युटर्स मंडणगडचे संचालक, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.शशिकांत चोरगे यांनी या संघासाठी स्पोर्ट ड्रेस किट सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले आहे.
असं म्हणतात ,’दान ही सर्व गुणांची जननी आहे .तो एक सद्गुण आहे.’ हा सद्गुण दानातून व्यक्त होत असतो. आणि तो व्यक्तीला
मानवतेकडे नेत असतो. शशिकांत चोरगे यांचा हा गुण अनेक प्रसंगातून दिसून आलेला आहे. आपण ज्या विद्यालयात शिकलो, त्या विद्यालयाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून त्यांनीही दानाची परंपरा जपलेली आहे. इतरांबद्दल प्रेम, सद्भावना, परोपकार आणि मानवतेच्या दृष्टीने नेहमीच ते विद्यालयाला सहकार्य करत असतात. या गोष्टींचा जीवनावर सकारात्मक प्रभाव पडत असतो.

 

 

शशिकांत चोरगे यांनी शिक्षक दिनानिमित्ताने सर्व शिक्षकांना सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले होते.
त्यांनी खेळाडूंना दिलेल्या किट मुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साह दिसून आला. असे म्हणतात, देणाऱ्याने देत जावे. घेणाऱ्याने घेत घेत जावे. घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणे हा शशिकांत चोरगे यांचा जो गुण आहे तो, सर्वांनी घेण्यासारखा आहे. अपार कृतज्ञता व काहीतरी देण्याची तयारी, यामुळे सतत त्यानी शाळेसाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे.
त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे, उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हुल्लोळी, पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर तसेच क्रीडा शिक्षक श्री. मनोज चव्हाण व श्री. संजय अवेरे यांनी आभार व्यक्त केले.