बांदा : प्रतिनिधी
महाराष्ट्र – गोवा सीमेवर सातार्डे पुलावरून आज सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास युवकाने तेरेखोल नदीपात्रात उडी मारली. स्थानिकांनी सदर युवकाला उडी मारताना पाहिले. स्थानिक वाळू व्यवसायिकांनी नदीत त्या युवकाला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आढळून आला नाही. सातार्डे पोलीस दुरक्षेत्राचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत त्या युवकाचा शोध लागलेला नाही. सदर युवक आरोस – कोंडुरा येथील असल्याचा स्थानिकांचा अंदाज आहे. त्याचे आधारकार्ड घटनास्थळी आढळून आले आहे. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.











