मनसे सासोलीवासियांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : उबाठा गटाचे ओरिजीन कंपनी बरोबर साटेलोटे आहे. त्यामुळे उबाठा गटाचे दोन्ही बाजुचे नेते लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तु मारल्या सारखं कर मी रडल्यासारख करतो असा त्यांचा खेळ सुरु आहे पण अशा या भुलथापाना लोक आता बळी पडणार नाहीत. सासोली ग्रामस्थाच्या बाजुने मनसे राहणार ठाम पणे उभी आहे, असे आश्वासन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी दिले आहे.
थोड्याच दिवसात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार असून त्या दौऱ्यात मनसे प्रदेश सरचिटणीस संदिप दळवी आणि कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनात सासोली ग्रामस्थांची राजसाहेब ठाकरेंशी भेट घालुन देणार आहोत. त्या नंतर मनसे ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असून सासोलीतील पिडीत ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले











