कोतवाल हजर राहत नसल्याने ग्रामस्थांच्या कामांचा होतोय खोळंबा

 

साटवली ग्रामपंचायतीचे प्रांतांना पत्र

लांजा (प्रतिनिधी)

तालुक्यातील साटवली ग्रामपंचायत तलाठी कार्यालयामध्ये कोतवाल म्हणून काम करणाऱ्या त्रिशा शिंदे या वेळेवर हजर राहत नसल्याने ग्रामस्थांच्या कामाचा खोळंबा होत आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी साटवली ग्रामपंचायती च्या वतीने करण्यात आली आहे .
याबाबत उपविभागीय अधिकारी (प्रांत कार्यालय) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साटवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तलाठी सजा साठवली कार्यालय आहे. याच सदरच्या तलाठी सजा मध्ये साटवलीसह सडवली,रूण ,पनोरे, व इसवली या गावांचा समावेश आहे .सद्यस्थितीत सदरच्या तलाठी सजावर श्रीमती त्रिशा शिंदे यांची तलाठी कोतवाल म्हणून डिसेंबर २०२३ मध्ये नियुक्त झालेले आहे. सदर कोतवाल आजतागायात आपल्या सजावर हजर राहलेल्या नाहीत. कोतवाल हजर न राहिल्यामुळे साटवली हा मोठा सजा असल्यामुळे व त्या अंतर्गत ज्या गावांचा समावेश होतो ती गावी तलाठी सजापासून ५ ते ७ किमी डोंगर भागातील असल्यामुळे तेथून येणाऱ्या ग्रामस्थांची कामे न झाल्यामुळे त्रास होतो.
तसेच गणेशोत्सव कालावधीमध्ये आलेल्या ग्रामस्थांनाही ई पीक पाहणी हा शासनाचा उपक्रम असून देखील कोतवाल नसल्याने ग्रामस्थांना माहिती देता आली नाही असे या निवेदनात म्हटले आहे.
यापुर्वी देखील कोतवाल हजर रहात नसल्याने लाजा तहसिलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. कोतवाल नसल्याने लोकाची कामे प्रलबित आहेत. महसुल वसुलीचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले होते.