मंडणगड : प्रतिनिधी ;येथील मंडणगड तालुका विकास मंडळ ,मंडणगड. संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी, शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे.
सोमवार दिनांक 23 व मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल देव्हारे येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत १)14 वर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक
२) 17 वर्ष वयोगट मुले प्रथम क्रमांक
३)17 वर्षे वयोगट मुली प्रथम
४) 14 वर्षे वयोगट मुली द्वितीय क्रमांक
५) 19 वर्ष वयोगट मुले द्वितीय क्रमांक व
६)19 वर्ष वयोगट मुली तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेले 14 वर्षे मुले व 17 वर्षे मुली व मुले हे तिन्ही संघ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ते जिल्हास्तरीय स्पर्धेत मंडणगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील .
या संघांना क्रीडा शिक्षक श्री. मनोज चव्हाण, श्री. संजय अवेरे , सौ स्वरा देवघरकर तसेच स्मिता गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी उतुंग यश मिळवत खेळातील आपला दबदबा कायम राखला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष, सरचिटणीस व सर्व संचालक मंडळ ,तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक ,पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
मंडणगड परिसरातून या संघांवर अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.












