वेंगुर्ले : प्रतिनिधी :मातोश्री कला क्रीडा मंडळ, वेंगुर्ला यांचे वतीने दाभोली नाका, वेंगुर्ला येथे ३ ते १२ ऑक्टोंबर या कालावधीत “सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रौत्सव दरम्यान मंडळाकडून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या साठी निवडण्यात आलेल्या नवरात्रौत्सव समिती अध्यक्ष पदी उद्योजक श्री विलास प्रभाकर गावडे यांची तर उपाध्यक्ष श्री तुषार नारायण साळगावकर, सचिव श्री बाबली रामा वायंगणकर, खजिनदार श्री विष्णू (पप्पू) रामचंद्र परब यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री विष्णुदास (दादा) कुबल यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंडळाचे सदस्य श्री वसंत तांडेल, नवरात्रौत्सव समिती अध्यक्ष श्री विलास गावडे आणि मंडळाचे पुरोहित श्री श्रीकांत रानडे यांचे प्रमुख उपस्थितीत मंडळाच्या दाभोली नाका येथील कार्यालयात बैठक संपन्न झाली यावेळी सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२३ चा आढावा घेऊन सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२४ करीता कार्यक्रम समिती गठित करण्यात आली. समिती च्या सदस्य पदी श्री विनायक (सुहास) सदानंद गवंडळकर, प्रणव बाबली वायंगणकर, भूषण भगवान सारंग , तन्मय प्रकाश जोशी , श्री जाॅन्सन आगोस्तिन डीसोजा , श्री मारुती मन्याप्पा दोडशानट्टी , श्री कमलेश सुरेश सामंत यांची एकमताने निवड करण्यात आली
यावेळी जि .प.माजी सभापती श्री प्रितेश राऊळ, भानुदास मांजरेकर , श्री राघवेंद्र जोशी , श्री दीपेश केरकर , श्री नामदेव सरंबळकर , श्री अविनाश सडवेलकर , श्री अनंत मिड्ये , श्री शरद मेस्त्री , श्री प्रकाश डीचोलकर , श्री प्रमोद वेर्णेकर , श्री सायमन आल्मेडा , श्री सुधीर डीचोलकर, श्री संदीप कोयंडे उपस्थित होते. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन श्री वसंत तांडेल यांनी केले.












