ज्ञानदीपच्या विद्यार्थ्यांची राज्य ज्युदो स्पर्धेसाठी निवड

खेड(प्रतिनिधी) भडगाव येथील ज्ञानदीप विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत बाजी मारली. या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्पर्धेत पलक कोकाटने रौप्यपदक तर स्नेहा घाडगे, सई आंब्रे, आर्यन गांधी यांनी सुवर्णपदक मिळवले. खेळाडूंना क्रीडाशिक्षक व पर्यवेक्षक संतोष भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्था चेअरमन अरविंद तोडकरी यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेराज जोयसर दीपक लठ्ठा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, भालचंद्र कांबळे, प्रफुल्ल महाजन, रूपल पाटणे, अनिल शिवदे, प्राचार्य राजकुमार मगदूम, मुख्याध्यापिका पूर्वा मोरे आदी उपस्थित होते.