धाकटे मांडवेत क्रिकेट स्पर्धा

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील धाकटे मांडवे येथे नवनिर्माण क्रीडामंडळ मुंबई धाकटे मांडवे यांच्यावतीने २४, २५ रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वाजता धाकटे मांडवे येथील हनुमान मंदिर येथे स्पर्धेचा शुभारंभ होईल. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज
यांनाही पारितोषिके देण्यात येणार आहेत.