बांद्यात पाककला स्पर्धेत सौ. दर्शना कावले प्रथम

 

 

व्ही. एन. नाबर प्रशालेचे आयोजन

बांदा : प्रतिनिधी :     येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदामध्ये पालकांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. दर्शना कावले (मुग कटलेट), द्वितीय सौ. रेश्मा सावंत (मुगा गाठी) व तृतीय क्रमांक रंजना धुरी (मुगाचे कढण) यांना देण्यात आला. एकूण १४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

 

तसेच विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत मध्ये सुद्धा भाग घेतला होता. विविध फुलांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या. सदर स्पर्धेसाठी सौ. मंगल मयेकर, जान्हवी नाईक, भाग्येश धुरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. परिक्षकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहाराबद्दल माहिती दिली. यावेळी शाळेची विद्यार्थिनी वेदीका देसाई हीने सरस्वती देवीची पुजा केली. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली भजने सादर केली.

 

दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा व आरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी योगेश्वर पाडलोकर, त्रिविक्रम उपाध्ये, बी. सतरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई आदी उपस्थित होते.