खेड(प्रतिनिधी) डीएड बीएड बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीत स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्याची आग्रही मागणी करत तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष नीलेश बामणे यांनी दिला आहे.
याबबात त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी पद्धतीने डीएड / बीएड उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेत परजिल्ह्यातील काही उमेदवार सरपंच अथवा पोलीस पाटील यांचा रहिवासी दाखला घेत भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचा खटाटोप करत आहेत. या भरती प्रक्रियेत स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य देण्यात यावे. नोकरीनिमित्त व व्यवसायानिमित्त परजिल्ह्यातून आलेले काहीजण पत्नीसह मुलांना
स्थानिक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीचे प्रकार झाल्यास ते खपवून घेणार नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
याप्रसंगी शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.











