खेडमध्ये दारूधंद्यावर धाड,एकावर गुन्हा

 
 
खेड (प्रतिनिधी) शहरातील कोष्टीआळी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दारूधंद्यावर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून ३,५८० रूपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.
 प्रकाश हरिश्चंद्र जाधव (५०, रा. भरणे) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून ३५ लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह त्यास रंगेहाथ पकडले. शहरात बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांवर धाडी • टाकण्याचे पोलिसांचे सत्र सुरूच असल्याने • व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.