लोटे येथे कारची एसटी बसला धडक

 

खेड (प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लोटे औद्योगिक वसाहत परिसरात आवाशी ते सीईटीपी दरम्यानचा नाल्यावरील छोट्या पुलावर कार तसेच एस. टी. बस यांची धडक झाली. अपघात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले या मध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार लोटे औद्योगिक वसाहतीतील जात असताना आवाशी ते सीईटीपी दरम्यान असलेल्या नाल्यावरील छोट्या पुलावर आली असता रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले व बाजूने पुढे जाणाऱ्या चिपळूण ते खेडच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसवर कार धडकली. अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे नुकसान झाले . मुंबई – गोवा महामार्गावर पडलेले खड्डे अपघातास कारणीभूत ठरत असल्याने प्रवासी व वाहनचालक याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.