खेड(प्रतिनिधी) खेड शहरातील ब्राह्मणआळी येथील सायकलप्रेमी विनायक वैद्य यांना सायकल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यात सायकलिंग क्लबच्या माध्यमातून सायकल वापराच्या प्रसारासाठी त्यांची अविरतपणे धडपड सुरू आहे. यासाठी विविध स्तरावर सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनासह रॅली काढून जनजागृती करण्याकरिता ते अग्रस्थानी असतात. जिल्ह्यातील हजारो लोकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
या कामगिरीची दखल घेत रोलर कोस्टर सायक्लोथॉनच्या वतीने सायकल गौरव पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.









