मालवण | प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय विविध साहित्यकृतींच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, या स्पर्धेत मालवण येथील सुनीता देवी टोपीवाला डी.एड. कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या ‘इथे निबंधांचिये नगरी’ या निबंधलेखन पुस्तकास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रा.नागेश कदम हे जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक असून निबंधलेखन म्हणून परिचित आहेत. निबंधलेखनाबरोबरच कवी, कथाकार, एकांकिका लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच बालभारती पुणे, अभ्यासक्रम समिती, विषय समिती यावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. यशदा पुणे संचलित जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेसाठी ते तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून काम करतात.
प्रा. नागेश कदम यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे, प्राचार्य हेमंत प्रभू सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.












