त्या युवतीचा वैद्यकीय (medical) अहवाल आला
रत्नागिरी l प्रतिनिधी :दोन महिन्यांपूर्वी चंपक मैदानात युवतीवर अत्याचार (assault) झाल्याच्या प्रकरणाला वैद्यकिय अहवाल (medical report) आणि तांत्रिक पुराव्यांमुळे (technical evidence) कलाटणी मिळाली आहे. तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे या अहवालामुळे निष्पन्न (revealed) झाले आहे. या प्रकरणात युवतीला आरोग्यविषयक समस्या (health issues) असल्यामुळे तिने आपल्यावर शारीरिक अत्याचार (physical abuse) झाले असावेत असा गैरसमज (misunderstanding) करून शहर पोलिस ठाण्यात (city police station) तक्रार (complaint) दिली होती.
चंपक मैदानात आपल्यावर अत्याचार (assault) झाल्याबाबत एका युवतीने 26 ऑगस्ट 2024 रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद (complaint) दिली होती. त्यावरून बी.एन.एस.चे (BNS) लम 64 (1) अन्वये गुन्ह्याची नोंद (crime registered) करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य (seriousness) व संवेदनशीलता (sensitivity) लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक (police superintendent) धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधिक्षक (additional police superintendent) जयश्री गायकवाड यांनी लागलीच 4 पोलिस अधिकारी (police officers) व 7 पोलिस अंमलदारांचे (constables) एक “विशेष तपास पथक” (special investigation team) नेमून तपास करण्याचे आदेश (orders) दिले होते.
दरम्यान, पीडित (victim) युवतीची जिल्हा शासकीय रुग्णालयात (district government hospital) या गुन्ह्याच्या अनुषंगाने (related to the crime) पूर्ण वैद्यकिय तपासणी (medical examination) करून त्याचे नमुने (samples) घेण्यात आले. त्यानंतर ते न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (forensic laboratory), कोल्हापूर यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासात युवतीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस (interrogation) केल्यानंतर एकूण 26 साक्षिदारांची (witnesses) चौकशी (inquiry) करून जबाब (statements) नोंदवण्यात आले.
तसेच रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासून (reviewed) त्याआधारे हा तपास करण्यात आला. या तपासात युवतीवर कोणताही अत्याचार (abuse) झाला नसल्याबाबतचा अहवाल (report) न्यायालयात (court) सादर (submitted) करण्यात आलेला आहे.











