ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांनी आयोजीत केलेल्या ओटवणे पंचक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेत आकाश मेस्त्री आणि मित्रमंडळ यांनी तयार केलेल्या आकर्षक नरकासुराचा प्रथम क्रमांक तर गावठणवाडी चव्हाटा मंडळाचा द्वितीय क्रमांक तर चौगुलेवाडी ओटवणे मंडळाने बनविलेल्या नरकासुरचा तृतीय क्रमांक आला .
या स्पर्धेतील या प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मंडळासाह तारीवाडी, मेस्त्रीवाडी, रिद्धी सिद्धी ग्रुप, दशावतारी कलाकार आनंद गावकर, गुरु मळेकर यांचेही नरकासुर लक्षवेधी ठरले. खास करून या मंडळानी केलेल्या हालत्या नरकासुरानी प्रेक्षकांची मने जिंकली खास करून गावठणवाडी मंडळाने सादर केलेला श्रीकृष्ण च्या बाणाने नरकासुराचा वध या देखाव्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण या स्पर्धेसाठी सर्वोतपरी सहकार्य करणारे गावठणवाडी कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, सामाजिक युवा कार्यकर्ते बबलू गावकर यांच्यासह,आनंद मेस्त्री, बाळा गावकर, आनंद गावकर, एकनाथ गावकर, महेश गावकर, आनंद भैरवकर, रामा म्हैसकर, आनंद भैरवकर, मंगेश गावकर, नवीन भराडी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. आकाश मेस्त्री याला या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे ५००१ रुपये, तर गावठणवाडी मंडळाला ३००१ रुपये,तर चौगुले मंडळाला २००१ रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी दरवर्षी पेक्षा यावर्षी स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला ओटवणे सारख्या ग्रामीण भागातही अशी भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केल्या बद्दल उपस्थित ओटवणे ग्रामस्थ आणि पंचक्रोशी ग्रामस्थ यांनी मंडळाचे कौतुक करत चौगुले मित्रमंडळाला शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी लिंगोजी सुतार, बाळू पनासे, बाळा गावकर, गोटया गावकर, मनोज शेट्टी पंच म्हणून यानी काम पाहिले.स्पर्धेच्या यशस्वी तेसाठी उदित गावकर, प्रथमेश गावकर, प्रमोद गावकर, सुनिल गावकर, गजानन गावकर, प्रणव गावकर, विशाल गावकर, तुषार गावकर, ऋषिकेश गावकर, देविदास गावकर, देवेश भैरवकर यानी मेहनत घेतली










