३८ वर्षे तरुणाची गळफास लावून आत्महत्या, गवाणे बौद्धवाडी येथील घटना

 

लांजा (प्रतिनिधी) ३८ वर्षीय तरुणाने रिक्षाच्या केबलने घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील गवाणे बौद्धवाडी येथे आज बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक आनंद उर्फ अनंत कांबळे ( ३८ वर्षे, रा. गवाणे, बौध्दवाडी) याचे लांजा बाजारपेठ येथे राहणाऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते. ही बाब त्याच्या कुटुंबीयांना समजल्यावर काल मंगळवारी त्याचे कुटूंबियांनी विनायक आनंद उर्फ अनंत कांबळे याला सोबत घेऊन लांजा येथे त्या महिलेकडे जाऊन दोघांची समजूत घातली होती. त्यानंतर दोघांनीही व्यवस्थित वागण्याचे ठरविले होते. मात्र आज पहाटे ५ ते ५.३० या दरम्यान घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला रिक्षाच्या केबलने गळफास घेवून आत्महत्या केली.
याबाबतची फिर्याद आनंद उर्फ सयाजी कांबळे यांनी लांजा पोलिसांना दिली. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे हे करत आहेत.