सावंतवाडी । प्रतिनिधी : संयुक्त महाराष्ट्र चळवळ, पत्रकारीता, राजकारणातील प्रवास अशा वेगवेगळ्या वळणवाटावरच्या जिवनातील खडतर प्रवासाचे वर्णन करणारे जेष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी शब्दबद्ध केलेल्या ” स्मरण साखळी” पुस्तकाचे मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात सावंतवाडी पत्रकार संघ आणि अण्णा केसरकर मित्रमंडळ यांच्या माध्यमातून प्रकाशन होणार आहे.
यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, जेष्ठ पत्रकार किरण ठाकूर, अण्णा ठाकूर, माजी आमदार शंकर कांबळी, भाई गोवेकर, पत्रकार परिषदेचे गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
याबाबतची माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत अण्णा केसरकर यांनी दिली. यावेळी सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण मांजरेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे आदी उपस्थित होते.
Sindhudurg