नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांची आपल्या मूळ वेंगुर्ले गावी भेट

 

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

राजापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी आज त्यांच्या सिंधुदुर्ग येथील मूळ वेंगुर्ले येथील गावी भेट दिली. तसेच परूळे येथील श्री देव आदिनारायण मंदिरात दर्शन घेतले.

ते आपल्या पत्नी समवेत आले होते. दाभोली येथील मठ संस्थान तसेच वेंगुर्ले मूळगावी देवाचे दर्शन घेतले. कुडाळ येथे त्यांचे ओमकार देसाई, नुपूर सामंत, विनय सामंत, साईराज नाईक, मनोज वालावलकर, नगरसेविका चांदणी कांबळी यांनी स्वागत केले.