खेड (प्रतिनिधी)– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते तसेच दयाळ जिल्हा परिषद गटातील सामाजिक कार्यकर्ते आणि निवृत्त शिक्षक पै. अब्दुल करीम सदरुद्दिन तांबे (अ.स. तांबे) यांना पक्षाच्या वतीने खेड येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनाने समाजकार्य व शैक्षणिक क्षेत्रातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.
श्रद्धांजली कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष श्री. बाबाजी राव जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष श्री. स.तु. कदम, तालुकाध्यक्ष श्री. संजय जाधव, माजी तालुकाध्यक्षा सौ. नम्रता ताई भोसले, युवक जिल्हाध्यक्ष श्री. अजिंक्य (बाळू) आंब्रे, श्री. मुखत्यार भाई कावलेकर, श्री. जलाल भाई राजपूरकर, श्री. मोझम परकार, सौ. जयमाला ताई पाटणे, श्री. शत्रूघ्न मोरे, श्री. उमेश देवरुखकर, श्री. श्रीधर गवळी, श्री. नितीन बळीराम डेरवणकर, श्री. दाऊद अकबर दुदुके, श्री. प्रफुल्ल मोरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी तांबे सरांचे कार्य, समाजाशी असलेली नाळ आणि पक्षाप्रती असलेली त्यांची निष्ठा यांची आठवण करून देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.












