( चिपळूण वार्ताहार ) नांदिवसे येथील गावठाण व स्वयंदेव पासून तीन किमी अंतरावर सहयाद्रीच्या पायथ्याशी जंगलमय वैतरणा नंदिकाठी वसलेल्या श्री कालभैरव, श्री चंडिका देवी, श्री जोगेश्वरी देवी मंदिरात श्री. कालभैरव जन्मोत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात दिमाखात पार पडला. यावेळी श्री. कालभैरव जयघोष करीत हजारो भाविकांचा जनसागर सह्याद्रीच्या कुशीत लोटला होता
शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी स्थापित देवतांचे पूजन, 11 ते 12 वा. अभिषेक व हवन, दुपारी 1 ते 2 वा. श्री. सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी हरिपाठ, 9 वा.श्री जानाई देवी,श्री.वाघजाईदेवी मंदिरातून अबदागिरी आणि निशाण यांचे आगमन,रात्रौ ग्रामस्थांचे भजन व काकड आरती तसेच शनिवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11.45 वा.ग्रामस्थांचे भजन दुपारी 12 वा. श्रींचा जन्मोत्सव दुपारी12.15 ते 1 वा. श्री कालभैरव ध्यानं, स्तोत्र, श्री. कालभैरवाष्टकाचे पठण,ॐ श्री.कालभैरवाय नमः या तारकमंत्राचा सामूहिक जप, पाळणा व आरती. दुपारी 1 ते 3 वा. तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद रात्रौ १० वा. महाआरती आणि गजर कार्यक्रम झाला. उत्सवासाठी रात्रीपासून श्री.कालभैरव मंदिरापासून दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. या कार्यक्रमात माहेरवासीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी श्रींचे पुजारी, मुख्य पुजारी यांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा झाला भाविकांनी गुलाल पुष्पवृष्टी करून चांगभलंचा गजर केला. काळभैरव पाळणा गीत म्हटले. यावेळी गावकरी, ग्रामस्थ, पुजारी आणि मान्यवरांच्या उपस्थित सोहाळा संपन्न झाला. गुलाल फुलांची उधळण केली कालभैरवाची भैरवरुपात उत्सवपूजा बांधण्यात आली होती. फुलांची आकर्षक सजावट केली होती. ज्योतिबाची चतुर्भुज रूपात पूजा बांधण्यात आली होती. काळभैरव नावाने चांगभलं झाला. सुंठवडा वाटप केला. फटाक्यांची आतषबाजी करून सोहळ्याची सांगता झाली. भावगीत व भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर झाला.











