आय.सी.एस. मध्ये तालुका विधी सेवा समितीतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

खेड (प्रतिनिधी) येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये संविधान दिनाचे औचित्य साधत, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात खेड न्यायालयाचे श्री.जी.एस.दिवाण (जॉईंट सिव्हिल जज, वरिष्ठ विभाग) यांनी ‘नॅशनल लीगल सर्विसेस डे’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी विविध कायद्यांबाबत माहिती देवून मोफत कायदेशीर सल्ला कसा मिळवता येतो? याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

त्याचबरोबर श्री.एस.एम.चव्हाण (जॉईंट सिव्हिल जज, कनिष्ठ विभाग) यांनी ‘नॅशनल एज्युकेशन डे’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी संविधानामधील शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
महाविद्यालयाच्या प्राचार्यां प्रो.डॉ.अनिता आवटी यांनी संविधान दिनाबाबत सर्वांना शुभेच्छा देऊन, उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल मान्यवरांचे आभार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.एम.के.केळकर, प्रा.एस.व्ही.मस्के, प्रा.सुप्रिया काडगे, सर्व विद्याशाखा प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.रोहित कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा.सुप्रिया काडगे यांनी केले.