प्रत्येक नागरिकाला संविधानाप्रमाणे जगण्याचा अधिकार.

संविधानाची संवर्धन करण्याची जबाबदारी न्यायालय वकील व पोलीस यांची.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे.

सिंधुनगरी प्रतिनिधी

कोणताही नागरिक असो, तो पीडित असो, आरोपी असो, त्याला संविधाप्रमाणे अधिकार दिलेला आहे. म्हणूनच संविधानाने दिलेल्या अधिकाराचे संवर्धन करणे आवश्यक आहे.आणि हे काम करण्याची जबाबदारी न्यायालय, वकील व पोलीस या सर्वांची असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी रविवारी येथे केले. येथील शरद कृषी भवन च्या सभागृहात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा व सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने संविधान महोत्सव आणि नांदोस हत्याकांड चर्चासत्र (टाक्स ) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला न्यायमूर्ती नितीन बोरकर , सिंधुदुर्ग चे प्रधान जिल्हा न्यायाधीश एच बी गायकवाड, बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड संग्राम देसाई जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड परिमल नाईक ज्येष्ठ वकील अँड. जयंत जायभावे जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अँड.गजानन चव्हाण अँड.विवेकानंद घाटगे अँड.विवेक मांडकुलकर आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती डांगरे आणि न्यायमूर्ती बोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अँडगजानन चव्हाण यांनी संविधान वाचन केले

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी भारतीय राज्यघटना आर्टिकल 19 आणि 21 अनुच्छेद 14 यावर मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहे. संविधाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे पीडित व्यक्तीला ही अधिकार आहे. आरोपीलाही अधिकार आहे. त्यामुळे या सर्वांच्या अधिकाराचे संवर्धन करणे संविधानाच्या दृष्टीने आवश्यकच आहे हे अधिकार संवर्धन करण्याची जबाबदारी न्यायालय पोलीस आणि वकील या सर्वांचीच असल्याचे स्पष्ट केले.यावेळी न्या.डांगरे यानी साबरमला ट्रिपल तलाक आदीवर संविधान वर आतापर्यंत सर्वोच्य न्यायालय आणि उच्च न्यायालयात झालेले निवाडे केसेस विस्तृत सांगितले.

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड संग्राम देसाई यांनी आढावा घेताना वकिलाना वेल्फेअर फंड आणण्याचा आमचा मानस आहे तसेच नवोदित वकिलाला टायफंड देण्याचाही प्रयत्न करीत आहोत त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरला खंडपीठ होण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे तसेच तळोजा येथे प्रशिक्षण केंद्र होत असून याचा लाभ सर्व वकील मंडळींनी घ्यावा असे आवाहन केले प्रास्ताविकात अँड पररीमलनाईक यांनी वकील संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. ज्येष्ठ वकील जयंत जायभावे यांनी सिनेमात दाखवल्याप्रमाणे न्यायालय चालत नाही ही नवोदित वकिलांनी ध्यानात घ्यावे त्यांनी वकिलांना केस चालवण्याचे बारकावे सांगितले वकील आणि प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले सविधान लाला धरूनच कामकाज चालते मोबाईलच्या फेस टाइम मध्ये संविधानाला महत्त्व द्या संविधान जनतेपर्यंत पोचवा तरच लोकशाही सशक्त होईल असे त्यांनी सांगितले तसेच कोलापुरात येत्या सहा महिन्यात खंडपीठ होईल असेही सुचवा त्यांनी केले जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश एच बी. गायकवाड यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले. काय मूर्ती नितीन बोरकर यांनी वकिलांना प्रशिक्षणाची गरज आहे प्रशिक्षणाच्या माध्यमातून फिटनेस ला काय विचारावं हे आपल्याला समजतं असे त्यांनी सांगितले यावेळी सहाय्यक सरकारी अभियंता अँडआरती पवार अँड चंद्रकांत सावंत आणि हिरकणी म्हणून अँड. सुवर्णा हरमलकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास परब यांनी केले तर ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी आभार मानले यावेळी जिल्ह्यातील जेष्ठ वकील अँड अजित भणगे, अमोल सामंत यतीश खानोलकर सूर्यकांत प्रभू खानोलकर अँड.कीरण डांगी संदीप निंबाळकर राजेश परुळेकर अविनाश परब सुषमा प्रभू खानोलकर तसेच जिल्ह्यातील व नजीकच्या जिल्ह्यातून आलेले वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केशवानंद भारती केस यावर अँड गणेश शिरसाट यांनी व्याख्यान दिले