वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांना पितृशोक

 

माजी सरपंच अर्जुन गावडे यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : वेत्ये गावचे माजी सरपंच अर्जुन गुणाजी गावडे (७०, रा. गावडेवाडी ) यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. वेत्ये गावचे सरपंच म्हणून त्यांनी काही वर्षे कारभार पाहिला होता. एक हसतमुख व समाजाप्रती तळमळ असलेले व्यक्तिमत्व म्हणून ते दशक्रोशीत प्रसिद्ध होते.

 

 

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. वेत्ये गावचे विद्यमान सरपंच गुणाजी गावडे यांचे ते वडील होत. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वेत्ये येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.