साळशी- सरमळेवाडी शाळेला कपाट व खुर्च्यांची भेट वस्तू प्रदान

 

शिरगाव ( प्रतिनीधी) देवगड तालुक्यातील जि.प. साळशी- सरमळेवाडी या प्रशालेला येथील रहिवाशी श्रीमती वासंती कुंडलीक कदम ( कै.कुडलिक दाजी कदम)यांच्या स्मरणार्थ ७००० रुपये किमतीचे गोदरेज कपाट देणगी स्वरूपात भेट दिले आहे.
तसेच सुजय कदम यांनी या प्रशालेला व देवणेवाडी अंगणवाडीला प्रत्येकी २-२ प्लास्टिक खुर्च्या देणगी स्वरूपात भेट दिल्या आहेत.

 

 

वासंती कदम व सुजय कदम यांनी सामाजिक जाणिवेतून या शाळेला दिलेल्या वस्तूरुपातील देणगीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक व पालकांनी आभार मानले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांनीही आभार मानले आहेत.
साळशी ग्रामपंचायत सदस्या आदिती रावले यांच्या प्रयत्नातून या प्रशालेला कपाट व खुर्च्या या देणगी स्वरूपात भेट वस्तू प्राप्त झाल्या आहेत.

 

 

या कार्यक्रमास साळशीचे उपसरपंच कैलास गावकर, प्रभाकर साळसकर, निलेश गावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योती मिराशी,उपाध्यक्ष मिनाक्षी देवणे,देवणेवाडी अंगणवाडी सेविका प्रतिक्षा शिवलकर, मदतनीस संध्या नाईक, या प्रशालेचे मुख्याध्यापक समाधान कोळी,निलेश ठाकरे सर,राजेंद्र साटम ,विद्यार्थी आदी उपस्थित होते.