खेड (प्रतिनिधी) अखिल भारतीय महा-ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्राचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन ८ डिसेंबर रोजी शिर्डी येथे होणार असल्याची माहिती कार्यकारिणी सदस्य प्रा. अरुण काकडे यांनी दिली.
अखिल भारतीय महा ई सेवा केंद्रचालकांचे प्रश्न शासनदरबारी मांडून सोडवण्याचे काम केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात सेवा केंद्रचालकांना येणाऱ्या अडचणींबाबत विचारविनिमय करून त्या सोडवण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा
करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनेही विचारविनिमय करण्यात येणार आहे.
भविष्यात महा-ई केंद्रांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने अधिवेशनात ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. या अधिवेशनात सर्व केंद्र संचालकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अरुण काकडे यांनी केले.










