नाणीज हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा संपन्न

 

लांजा (प्रतिनिधी) नाणीज पंचक्रोशी शिक्षणोत्तेजक मंडळ आयोजित इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी २०२५ च्या दृष्टीनें अभ्यास कसा करावा या विषयावर आधारित कार्यशाळा दि. ७ डिसेंबर रोजी माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज नाणीज या ठिकाणी संपन्न झाली.

 

या कार्यशाळेला ५० पालक, ६० विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते. प्रभुदेसाई अकॅडमी , पुणे चे कोकण विभागीय कार्यवाह तथा व्ही. एम. इंग्लिश मेडीयम स्कूल, लांजा चे प्राचार्य अनुराग पानिग्रही यांनी आपल्या अभ्यासू, खेळकर व प्रभावी शैलीने इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना या निमित्त मार्गदर्शन केले व पालकांशी संवाद साधून उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले.

 

ही कार्यशाळा संस्था अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रेरणेने व प्राचार्या सौ. सावंतदेसाई यांच्या मार्गदर्शनाने पार पडली. या कार्यशाळेचे सूत्र संचालन प्रशालेतील शिक्षक प्रमोद वाघरे व शेवटी आभार प्रदर्शन सौ. रमा मुळये यांनी केले.