लांजात शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी नगरसेवक लहू कांबळे शिवसेनेत

आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत तालुक्यातील बौद्धजन संघटनेचे पदाधिकारीही शिवसेनेत दाखल

लांजा (प्रतिनिधी) लांजा शहरात शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक व लांजा तालुका बौद्धजन संघटनेचे उपाध्यक्ष लहू कांबळे यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांना सोबत तालुक्यातील विविध बौद्धजन संघटनांचे अनेक पदाधिकार्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश कार्यक्रम रविवारी सायंकाळी लांजा शेट्येवाडी येथील राजाराम पर्शराम शेट्ये सभागृहात पार पडला. यावेळी आमदार किरण सामंत यांनी नगरसेवक लहू कांबळे यांच्यासह सर्व
नवागत कार्यकर्त्यांचे स्वागत करताना पक्ष संघटन बळकटीसाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार सामंत म्हणाले, “लहू कांबळे हे राजकारणासाठी नव्हे तर लांजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत आले आहेत. विकासाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवणे हेच त्यांचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
पक्षप्रवेशांमध्ये लांजा ग्रामस्थ बौद्धजन मंडळ ग्रामीण बौद्धवाडी चे माजी अध्यक्ष दिलीप कांबळे, माजी अध्यक्ष आनंद कांबळे ,अध्यक्ष सुदेश कांबळे ,अध्यक्ष मधली वाडी मोहन कांबळे ,उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे ,सेक्रेटरी विशाल पवार, संदीप कांबळे, राजन कांबळे, किशोर कांबळे ,संदेश कांबळे, अंकुश कांबळे, नागेश कांबळे, बबन कांबळे, तुषार कांबळे, सिद्धार्थ कांबळे, तुषार कांबळे, भीमराज कांबळे, संदेश कांबळे, महेंद्र कांबळे, माणिका कांबळे, प्रकाश कांबळे ,चंद्रकांत कांबळे, दिनेश कांबळे ,अनंत कांबळे, सिकंदर कांबळे, चंद्रगुप्त कांबळे, पांडुरंग कांबळे ,प्रवीण कांबळे, अमोल पडवळ, गणपत कांबळे ,सागर कांबळे, प्रजन कांबळे, केशव कांबळे, अरुण कांबळे, मुन्ना बाळू रंगी, पैगंबर नाईक, सुजल कांबळे, सखाराम कांबळे, अनिल कांबळे ,संतोष जाधव ,बाळकृष्ण,साहिल झोरे, संतोष झोरे सौरभ, प्रसाद कांबळे, गौतम कांबळे,तुषार माने ,साई बाळूरंगी,मनमुली मौका साब मनमुली ,रियाज मन मुली, कुतुब मनमुली,मेहबूब सुबड, सलीम सुबड ,रियाज सुबड, बाजी कांबळे, साई बाळू रंगी, हजार मनखायान, नितीन कांबळे ,नवनीत कांबळे, संजय कांबळे, प्रितेश कांबळे रवी कांबळे ,ॲड. रुपेश कांबळे आदीनी प्रवेश केला.
या कार्यक्रम प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उद्योजक
विकास शेट्ये ,एस एन कांबळे, सचिन डोंगरकर ,नितीन शेट्ये, जिल्हा बँक संचालक मुन्ना खामकर, प्रसाद माने, बाबा भिंगार्डे ,सुजित आंबेकर, प्रसन्न शेट्ये, दिनेश पवार, नंदराज कुरूप ,प्रसाद भाईशेट्ये , उपस्थित होते.